Ad will apear here
Next
कल्पनेला पडद्यावर साकारणारे ‘इल्युजन इथेरिअल’
पुण्याच्या चार युवकांची हॉलिवूड-बॉलिवूडवर छाप
‘इल्युजन  इथेरिअल स्टुडिओ एलएलपी’चे रणजीत गुगळे,  पंकज सोनवणे, विवेक जांबळे आणि भूषण हुंबे

पुणे : चित्रपटाच्या कथेची मांडणी, सादरीकरण याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आज व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानालासुद्धा आले आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक या आधुनिक तंत्रज्ञानाला प्राधान्य देत असल्याचे दिसते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या लाल कप्तान, हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांच्या ‘व्हीएफएक्स’ची सर्वत्र मोठी चर्चा होती. या चित्रपटांना ‘इल्युजन  इथेरिअल स्टुडिओ एलएलपी’च्या माध्यमातून पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे आणि रणजित गुगळे या पुण्यातील चार तरुणांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ केली आहे. ‘इल्युजन इथेरिअल’ने मराठी, हिंदीसह युरोपियन आणि हॉलिवूडपटावरही आपली छाप उमटविली आहे.

पंकज सोनवणे, विवेक जांबळे, भूषण हुंबे आणि रणजित गुगळे यांनी २००८ मध्ये ‘इल्युजन इथेरिअल स्टुडिओ एलएलपी’ची मुहूर्तमेढ रोवली. ही सर्जनशील टीम चित्रपट, दूरचित्रवाहिनी, अॅनिमेशन फिल्म अशा बहुविध क्षेत्रात कार्यरत आहे. कोणतीही कथा ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिकाधिक कल्पकतेने सादर करण्याचे कौशल्य या टीमकडे असल्याचे त्यांनी केलेल्या कलाकृतींच्या माध्यमातून दिसते.

या मराठमोळ्या तरुणांनी आपल्या कामाची सुरुवात ‘मल्टीपल मीन्स ऑफ मर्डर’ या युरोपियन चित्रपटापासून केली. त्यापुढे जात ‘गार्डियन ऑफ द गॅलेक्सी’, ‘डेडपूल’ अशा बिगबजेट हॉलिवूडपटासाठी काम केले आहे. त्यांनी आपल्या कामातून बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सैफ अली खानचा बहुचर्चित ‘लाल कप्तान’, अनुराग कश्यपचा ‘मनमर्जीया’, ‘मुक्काबाज’ आदी चित्रपटांसह  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित ‘लस्ट स्टोरीज’साठीही त्यांनी काम केले आहे. ‘इथेरिअल स्टुडिओ’ने मराठीमध्ये हिरकणी, फत्तेशिकस्त या चित्रपटांपूर्वी फँड्री, शाळा, रेगे, वाय झेड, हायवे, मुरांबा, जाऊ द्याना बाळासाहेब, फास्टर फेणे, तेंडल्या, गर्लफ्रेंड, धप्पा, आजोबा, डबल सीट अशा अनेक चित्रपटांसह आगामी ‘धुरळा’ आणि ‘वसंतराव’ या चित्रपटांच्या स्पेशल इफेक्ट्स आणि ‘व्हीएफएक्स’साठी काम केले आहे.

छोट्या पडद्यावरही इथेरिअल स्टुडिओने उत्तम कामगिरी केली असून, निक वाहिनीवर ‘मोटू पतलू’ आणि हंगामावर ‘वीर-द रोबो बॉय’ या अॅनिमेशन सिरिजसाठी ते काम करतात, तर वेब सिरीजच्या दुनियेतही त्यांनी काम केले आहे. याशिवाय अनेक बहुराष्ट्रीय उत्पादनांच्या जाहिराती आणि कॉर्पोरेट फिल्म्समधून त्यांनी आपल्या कल्पकतेची करामत दाखविली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZTXCH
Similar Posts
पुण्याच्या ओंकार मोदगीचा लघुपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुणे : पुण्यातील पटकथालेखक व दिग्दर्शक ओंकार मोदगी याच्या ‘डोगमा’ या लघुचित्रपटाची लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी लॉस एंजिलिसमध्ये हा लघुचित्रपट दाखवला जाणार आहे.
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले
एक लिटर पेट्रोलमध्ये १६० किलोमीटर; पुण्याच्या अथर्वने विकसित केली इलेक्ट्रिक-पेट्रोल हायब्रिड बाइक पुणे : एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १६० किलोमीटर धावणारी बाइक! विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. अथर्व राजे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पेट्रोलची बचत करण्यासाठी जुन्या बाइकवर संशोधन करून ही अनोखी इलेक्ट्रिक पेट्रोल हायब्रिड बाइक विकसित केली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होईल, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल, असे त्याचे म्हणणे आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language